नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण राष्ट्रीय कृषी विकास योजना रफ्तार राज्य शासन निर्णय २८ जुलै २०२१ चा शासन निर्णय माहिती आज या लेखात पाहणार आहोत. राष्ट्रीय कृषी विकास योजना रफ्तार अंतर्गत सन २०१८-१९ करिता वितरीत निधीपैकी ३८.८५ कोटी (३८ कोटी ८५ लाख) निधीचे पुनर्वितरण करणेबाबत महाराष्ट्र राज्य शासन निर्णय दिनांक २८ जुलै २०२१ तसेच सन २०१८-१९ करिता वितरीत निधी पैकी ६१.३४ कोटी (६१ कोटी ३४ लाख) निधीचे पुनर्वितरण करणेबाबत राज्य शासनाचा २८ जुलै २०२१ रोजी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
राष्ट्रीय कृषी विकास योजना रफ्तार अंतर्गत २०१८-१९ निधीचे पुनर्वितरण –
राष्ट्रीय कृषी विकास योजना रफ्तार अंतर्गत सन २०१८-१९ मध्ये राज्यात केंद्र व राज्य शासनाच्या ६०:४० प्रमाणात अर्थसहाय्य प्राप्त होऊन रुपये ५०८ कोटी एवढा निधी राष्ट्रीय कृषी कृषी विकास अंतर्गत मंजूर प्रकल्पांना वितरित करण्यात आलेला होता.
सदर निधीपैकी सर्वसाधारण प्रवर्गासाठी ४०६ कोटी ७५ लाख एवढा निधी वितरित करण्यात आलेला होता. आणि हा निधी ठरवलेल्या कालावधीत खर्च होण्याच्या शक्यतेनुसार अंमलबजावणी यंत्रणांनी समर्पित केलेला ०.१ कोटी निधी आणि वितरीत निधी ३१ कोटी ५६ लाख रुपये असा एकूण ३२ कोटी ३६ लाख निधी अजून कृषी आयुक्त यांच्याकडे फेर वितरणासाठी उपलब्ध झाला होता. त्यापैकी रुपये १८ कोटी ६३ लाख निधीच्या पुनर्वितरणास शासनाने मान्यता दिली असून शिल्लक राहिलेला उर्वरित निधी रुपये १३ कोटी ७३ लाख निधीस मान्यता देणे बाकी होते.
राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान -कोरडवाहू क्षेत्र विकास
राष्ट्रीय कृषी विकास योजना रफ्तार अंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गासाठी रुपये ५६ कोटी ५१ लाख निधीपैकी ठरवलेल्या कालावधीत खर्च होण्याच्या शक्यतेनुसार अंमलबजावणी यंत्रणांनी समर्पित केलेला रुपये १५ कोटी ३७ लाख निधी आणि अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी वितरित झालेला रुपये ४४ कोटी ७६ लाख निधीपैकी अंमलबजावणी यंत्रणांनी समर्पित केलेला रुपये १४ कोटी २७ लाख असा एकूण ३८ कोटी ८५ लाख एवढा निधी कृषी आयुक्त यांच्याकडे फेर वितरणासाठी उपलब्ध झालेला होता.
त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य शासनाने दिनांक २८ जुलै २०२१ रोजी २०१८-१९ करिता वितरीत करण्यात आलेल्या निधीपैकी रुपये ३८ कोटी ८५ लाख निधीचे पुनर्वितरण करण्यास मान्यता दिलेली आहे.
राष्ट्रीय कृषी विकास योजना रफ्तार अंतर्गत २०१७-१८ निधीचे पुनर्वितरण –
राज्यामध्ये सन २०१७-१८ करिता राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत केंद्र तसेच राज्य शासनाच्या ६०:४० प्रमाणात अर्थसहाय्य प्राप्त रुपये ६६४ कोटी ३६ लाख निधी हा राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत राबविल्या जाणाऱ्या विविध प्रकल्पांसाठी वितरित करण्यात आला होता.
या निधीपैकी सर्वसाधारण प्रवर्गासाठी रुपये ५३९ कोटी १६ लाख एवढा निधी वितरित करण्यात आलेला होता. तसेच ठरवलेल्या कालावधीत खर्च होण्याच्या शक्यतेनुसार अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांनी त्यापैकी रुपये २४ कोटी १७ लाख एवढा निधी समर्पित केला होता. आणि सदर निधीपैकी शिल्लक राहिलेला उर्वरित अवितरित असलेला निधी रुपये ७७ कोटी १३ लाख असा एकूण मिळून रुपये १०१ कोटी ३० लाख निधी हा कृषी आयुक्त यांच्याकडे फेर वितरणासाठी उपलब्ध झाला होता. त्या निधीपैकी रुपये ८५ कोटी निधी पुनर्वितरणास शासनाने मान्यता दिलेली होती आणि उर्वरित १६ कोटी २२ लाख निधीच्या पुर्नरवितरणास मान्यता दिलेली नव्हती.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका अनुदान योजना online form pdf 2021
तसेच अनुसूचित जाती प्रवर्गासाठी रुपये ६३ कोटी ७६ लाख एवढ्या निधीपैकी ठरवलेल्या कालावधीत खर्च होण्याच्या शक्यतेनुसार अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांनी रुपये २५ कोटी समर्पित केलेला होता. आणि सदर निधीपैकी वितरित असलेला ५ कोटी ६७ लाख असा एकूण रुपये ३० कोटी ६७ लाख कृषी आयुक्त यांच्याकडे वितरणासाठी उपलब्ध झाला होता.
असा हा राष्ट्रीय कृषी विकास योजना रफ्तार अंतर्गत शासन निर्णय दिनांक २८ जुलै २०२१ रोजी घेण्यात आला. त्यामध्ये रफ्तार योजनेअंतर्गत सन २०१७-१८ वितरीत निधी रुपये ६१ कोटी ३४ लाख निधीचे पुनर्वितरण करण्याबाबत राज्य शासनाने मान्यता दिलेली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा