मुख्य सामग्रीवर वगळा

शेळी-मेंढी, कुक्कुट, वराह पालन व वैरण बियाणे उत्पादनाकरीता 50 लाख रुपयापर्यंत अनुदान

 

National Livestock Mission 2021-2022

पशुसंवर्धनाद्वारे उद्योजकता आणि कौशल्य विकासावर आधारित ‘राष्ट्रीय पशुधन अभियान’ योजना!

 केंद्र शासनाने सन 2021-22 या  वर्षापासून पशुसंवर्धनाद्वारे उद्योजकता आणि कौशल्य विकासावर आधारीत नविन सुधारीत राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेस मंजूरी प्रदान केलेली आहे. सदर योजने अंतर्गत शेळी-मेंढी पालन, वराह पालन, पशुखाद्य आणि वैरण विकास या उपअभियानातंर्गत मुरघास निर्मिती, टीएमआर व फॉडर ब्लॉक निर्मिती, तसेच वैरण बियाणे उत्पादन अशा योजनाकरिता 50 टक्के अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 


अनुदानाची अधिकतम मर्यादा :

  • शेळी-मेंढी पालनाकरिता अधिकतम रु. 50 लक्ष, 
  • कुक्कुट पालनाकरिता अधिकतम रु. 50 लक्ष, 
  • वराह पालनाकरिता अधिकतम रु. 30 लक्ष 
  • पशुखाद्य व वैरण विकास यासाठी अधिकतम रु. 50 लक्ष अशी आहे. 

प्रकल्पाकरिता स्वहिसा व्यतिरिक्त उर्वरित आवश्यक निधी बॅंकेकडून कर्जाद्वारे उपलब्ध करुन घ्यावयाचा पर्याय दिलेला आहे.

सदर योजनेचा लाभ हा

  • व्यक्तीगत व्यावसायीक, 
  • स्वयंसहाय्यता बचत गट, 
  • शेतकरी उत्पादक संस्था, 
  • शेतकरी सहकारी संस्था, कलम 8 अंतर्गत स्थापन झालेल्या कंपनी, 
  • सहकारी दुध उत्पादक संस्था, 
  • सह जोखिम गट (जेएलजी), 
  • सहकारी संस्था, खाजगी संस्था, स्टार्ट अप ग्रूप इत्यादी घेवू शकतात.


    हे पण वाचा: PM Kisan Yojana

सदर योजनांच्या लाभाकरिता ऑनलाईन पदृधतीने अर्ज करावयाचा असून, अर्ज सादर करताना 

  1. सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर), 
  2. पॅनकार्ड, 
  3. आधार कार्ड, 
  4. रहिवाशी पूरावा (मतदान ओळखपत्र, 
  5. वीज देयकाची प्रत), छायाचित्र, 
  6. अनुभवाचे प्रमाणपत्र,
  7. वार्षिक लेखामेळ,
  8. आयकर रिटर्न, 
  9. प्रशिक्षण प्रमाणपत्र, 
  10. जमिनीचे कागदपत्र, 
  11. बॅंकेचा रद्द केलेला धनादेश इत्यादी सादर करणे (अपलोड) अनिवार्य असून,   
  12. जीएसटी नोंदणी इत्यादी उपलब्ध असल्यास सादर करावे.

सदर योजनेच्या सर्व मार्गदर्शक सूचना, वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न, अर्जाचा नमूना इत्यादी महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या संकेतस्थळ https://ahd.maharashtra.gov.in व केंद्र शासनाच्या संकेतस्थळ https://www.nlm.udyamimitra.in यावर उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. 

तसेच या योजनांची अतिरिक्त माहिती, अर्जाचा नमुना व वारंवार विचारण्यात येणाऱ्या प्रश्नाचा(FAQ) तपशिल देखील या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे. 

अर्ज सादर करताना सविस्तर प्रकल्प अहवाल DPR ,  पॅन कार्ड,  आधार कार्ड,  रहिवाशी पुरावा,  छायाचित्र, बँकेचा रद्द केलेला चेक इत्यादि ऑनलाईन अपलोड करणे अनिवार्य आहे. तसेच अनुभवाचे प्रमाणपत्र, वार्षिक लेखामेळ, आयकर रिटर्न, प्रशिक्षण प्रमाणपत्र, जमिनीचे कागदपत्र, जीएसटी नोंदणी प्रमाणपत्र उपलब्ध असल्यास सादर करावे लागणार आहे. 

टिप्पण्या

Popular Posts

MSRTC Free Travelling Scheme : हे कार्ड असेल तर सर्वांना मिळेल एसटीचा मोफत प्रवास, हि आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख

  March 8, 2023   by  Update 24 taas MSRTC Free Travelling Scheme : काही दिवसापूर्वीच महाराष्ट्र शासनाने 75 वर्ष वरील नागरिकांना संपूर्ण मोफत प्रवास देण्याची घोषणा केली होती आणि ती योजना राबवली सुद्धा यामुळे सर्वसामान्य व वयस्कर लोकांना याचा भरपूर फायदा झाला आहे.   पण याच्यामध्ये गैरप्रकार सुद्धा भरपूर प्रमाणात दिसत आहे आणि या गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने पुन्हा एकदा स्मार्ट कार्ड योजना राबविले आहे.   ही स्मार्ट कार्ड योजना 31 मार्च 2023 पर्यंत चालू राहणार आहे यामध्ये सर्व पात्र नागरिकांना मोफत प्रवासाची सुविधा मिळणार आहे हे कार्ड फिनो पेमेंट बँक व इतर खाजगी कंपनी मिळून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ सोबत कार्य करतात.  येथे क्लिक करा  शेतकरी प्रोत्साहन योजना 50 हजार प्रोत्साहन अनुदानाची तिसरी यादी जाहीर MSRTC Free Travelling Scheme   हे स्मार्ट कार्ड जर नागरिकाकडे असेल तर नेहमी तुम्हाला पैसे बाळगण्याची गरज पडत नाही त्यामध्ये टॉप-अप सुविधा सुद्धा दिलेले असते त्यामुळे त्या कार्डवर तुम्ही एकदा रिचार्ज मारले की 20...

Farmer loan Big Update ; शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी ३ लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज मिळणार शासनाचा नवीन निर्णय आलं

  Farmer loan Big Update ; शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी ३ लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज मिळणार शासनाचा नवीन निर्णय आलं March 25, 2023   by  Update 24 taas Farmer loan Big Update  : मित्रांनो खरंच जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर हा नक्की शेवटपर्यंत पहा ज्या शासन निर्णय मध्ये सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे सन 2022 23 मधील अर्थसंकल्पीय तरतुदीचे वितरण करणे बाबत डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना सर्वसाधारण घटकासाठी अर्थसहाय्य म्हणून महाराष्ट्र शासन सहकार व पनन वस्त्र उद्योग विभागांतर्गत पाच डिसेंबर 2022 रोजी हा निर्णय घेण्यात अला. येथे क्लिक करा  शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा     आलेल्या मित्रांनो या निर्णयामुळे अनेक शेतकरी बांधवांना नक्की दिलासा मिळणार आहे त्यासाठी व्हिडिओ एस्केप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्व माहिती सविस्तरता या ठिकाणी देण्यात आलेली आहे प्रस्तावनामध्ये माहिती देण्यात आली   येथे क्लिक करा  लग्नाच्या हंगामात सुरु करा ‘हा’ भन्नाट व्यवसाय; दरमहा होणार लाखोंची कमाई   राज्यातील शेतकऱ्यांना सहकारी कृ...

CPRI Recruitment 2023

  The Central Power Research Institute commonly known as CPRI, is presently an autonomous Society under the Ministry of Power, Govt of India. CPRI Recruitment 2023 (CPRI Bhart 2023) for 99 Engineering Officer, Scientific Assistant, Engineering Assistant, Technician, & Assistant Posts.   www.majhinaukri.in/cpri-recruitment  जाहिरात क्र.:   CPRI/01/2023 Total:  99 जागा पदाचे नाव & तपशील:   पद क्र. पदाचे नाव पद संख्या 1 इंजिनिअरिंग ऑफिसर ग्रेड I 40 2 सायंटिफिक असिस्टंट 04 3 इंजिनिअरिंग असिस्टंट 13 4 टेक्निशियन ग्रेड-I 24 5 असिस्टंट ग्रेड-II 18 Total 99 शैक्षणिक पात्रता: पद क्र.1:  (i) इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन / मेकॅनिकल/सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी   (ii) GATE 2021/2022/2023 पद क्र.2:  (i) B.Sc. (केमिस्ट्री)  (ii) 05 वर्षे अनुभव पद क्र.3:  (i) इलेक्ट्रिकल/सिव्हिल/मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा  (ii) 05 वर्षे अनुभव पद क्र.4:  ITI (इलेक्ट्रिकल) पद क्र.5:...