मुख्य सामग्रीवर वगळा

Walmart Foundation |देशातील शेतकऱ्यांचं बदलणार नशीब! शेतकऱ्यांसाठी ‘या’ नव्या योजनेची घोषणा, जाणून घ्या सविस्तर

 Walmart Foundation |बुधवारी झालेल्या वॉलमार्ट (Walmart Foundation) फाउंडेशनच्या बैठकीत त्यांनी आपली पाच वर्षांची नवीन रणनीती जाहीर (anounce) केली आहे आणि त्यात त्यांनी भारतातील शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी पुढाकार घेत 2028 पर्यंत 10 लाख अल्पभूधारक शेतकर्‍यांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट त्यांनी ठेवले आहे, तसेच यात किमान 50% टक्के तरी महिला (Womens) असतील असे त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच या योजने अंतर्गत उत्तर प्रदेश, कर्नाटक, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि ओडिशा यासह अनेक राज्यांमधील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याच्या उद्देशाने तसेच शेती एकत्रीकरणाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या ना-नफा संस्थांना देखील अनुदान दिले जाईल असे आश्वासन या बैठकीत देण्यात आले आहे.

यावेळी असे देखील सांगण्यात आले आहे की वॉलमार्ट फाऊंडेशनचे (Walmart)स्थानिक अनुदानधारकांना शेतकरी उत्पादक संस्था (FPOs) च्या क्षमता वाढीसाठी मदती करता सक्षम करेल, त्यासाठी महिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणावर विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे. यासोबतच आता शेतकऱ्यांसाठी बाजारपेठेतील संबंध वाढवणे तसेच पर्यावरणपूरक कृषी (Krishi)पद्धतीने आणि तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देणे शक्य होईल. जेणकरून त्यांना शेती या व्यवसायात त्यांना व्यवसायाच्या चांगल्या संधी उपलब्ध होतील.



वॉलमार्ट (walmart)फाऊंडेशनच्या नवीन पंचवार्षिक धोरणानुसार दोन नवीन अनुदानांची घोषणा करण्यात आली, ज्यात महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशमधील अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी टेक्नोसर्व्हला $3 दशलक्ष अनुदानाचा समावेश करण्यात आला आहे. तसेच 24 एफपीओ आणि 30,000 शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचे देखील उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवण्यात आले आहे, त्यापैकी 50% ह्या महिला असतील असे देखील सांगण्यात आले आहे. तसेच ट्रिकल अपला $533,876 अनुदान, ज्याचे उद्दिष्ट असे आहे की ओडिशातील 1,000 अल्पभूधारक महिला शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे व त्यांना तेथील दोन FPOs शी जोडणे हे आहे. तसेच वॉलमार्ट फाऊंडेशनने $25 दशलक्ष गुंतवणुकीचे उद्दिष्ट पार करून, आता 16 अनुदानितांसह 24 अनुदान उपक्रमाव्दारे भारतातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना मदत करणाऱ्या अनुदानांमध्ये $39 दशलक्षहून अधिक निधी उभारण्यात ते यशस्वी ठरले आहेत. त्याचप्रमाणे हे अनुदान आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, ओडिशा, झारखंड , पश्चिम बंगाल, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमध्ये देण्यात आले आहे.


आता अल्पभूधारक शेतकऱ्यांना मिळणार मोठा आधार

वॉलमार्ट (Walmart)फाउंडेशनच्या या नवीन अनुदानात गुंतवणुक केल्यास, अनुदानधारक हे 800,000 पेक्षा जास्त अल्पभूधारक शेतकऱ्यांना एकत्रितपणे मदत करतील. तसेच मदत मिळणाऱ्या शेतकऱ्यांन मध्ये 50% ह्या महिला शेतकरी असण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच वॉलमार्ट फाउंडेशनचे हे अनुदान नवीन वर्षाच्या अखेरीपासून करण्यात येणार आहे. या योजनेसाठी भारतातील संबोधी या कंपनीने केलेल्या अभ्यासानुसार तसेच त्यावरून आलेल्या निकषांना आधार दिला जाईल. तसेच या अभ्यासात विविध अनुदानित स्वयंसेवी संस्थांनी एफपीओ क्षमता वाढीसाठी घेतलेल्या विविध उपक्रमांचे विश्लेषण करण्यात आले आहे. तसेच या अभ्यासात असे दिसून आले आहे की या उपक्रमांमुळे मोठ्या प्रमाणात एफपीओ स्तरावर प्रणाली आणि प्रक्रिया ह्या बळकट झाल्या असून, याद्वारे कंपन्यांचा महसूल आणि नफा देखील वाढला आहे, त्यामुळे महिलांचे नेतृत्वात हे कृषी(Krishi) स्तरावर वाढण्यास फार मोठी मदत झाली आहे.

टिप्पण्या

Popular Posts

कृषि कर्ज | एल ॲण्ड टी फायनान्सतर्फे शेतकऱ्यांना फक्त 24 तासात मिळणार कर्ज! ‘या’ नव्या योजनेचा शुभारंभ, जाणून घ्या…

  Loan | शेती करताना नेहमीच पैशांची गरज भासते. परंतु आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज घ्यावे लागते. कर्ज (Loan) काढायचं म्हटलं की, त्यातच शेतकऱ्यांचा बराच वेळ जातो. परंतु आता शेतकऱ्यांसाठी एल अँड टी फायनान्सतर्फे (Finance) केवळ 24 दिवसांमध्येच कर्ज मंजूर होणार आहे. फायनान्सने शेतकऱ्यांसाठी एक योजना सुरू केली आहे. ज्याद्वारे शेतकऱ्यांना लवकरात लवकर कर्ज (Loan) मंजूर होईल. योजनेचा शुभारंभ एल ॲण्ड टी फायनान्स होल्डींग लिमिटेडची उपकंपनी असलेली आणि अग्रगण्य नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्यांपैकी एक असलेल्या एल ॲण्ड टी फायनान्स लिमिटेडने (एलटीएफ) वेअरहाऊस रिसिप्ट फाइनेंसिंग(डब्लूआरएफ) योजनेचा शुभारंभ केला आहे. कृषी-मालावरील कर्ज सुविधांसाठी अशा प्रकारची आणि डिजीटल स्वरुपातील पहिली वित्तसहाय्य योजना आहे. कसे दिले जाते वित्तसहाय्य? वेअरहाऊस रिसिप्ट फाइनेंसिंग (डब्लूआरएफ) कर्ज सुरक्षित करण्यासाठी तारण म्हणून कृषीमालाचा वापर करते. तारण कृषीमाल व्यावसायिकरित्या व्यवस्थापित वेअरहाऊस मध्ये पॅनेल नियुक्त व्यवस्थापकांद्वारे सांभा‌ळला जातो. या व्यवस्थेअंतर्गत, तारण कृषीमालाची गुणवत्ता आण...

रेशकार्ड मध्ये कुटुंबातील नवीन सदस्याचे नाव कसे टाकायचे | How to Add Name in Ration Card in Marathi

  How to Add Name in Ration Card in Marathi –   तुमच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचे नाव रेशन कार्ड मध्ये नसेल. तर तुम्ही हे नाव रेशन कार्ड मध्ये कसे टाकायचे. लग्न झाल्यानंतर तुमच्या कुटुंबात आलेल्या नवीन सुनेचे नाव रेशन कार्ड मध्ये कसे टाकायचे. नवीन जन्मलेल्या बाळाचे नाव रेशन कार्ड मध्ये कसे टाकायचे. रेशन कार्ड मध्ये नवीन नाव टाकण्यासाठी चा फॉर्म कसा डाऊनलोड करायचा. रेशन कार्ड मध्ये नवीन नाव Add करण्यासाठी काय करायचे सर्व माहिती दिली आहे. या माहितीचा वापर करून तुम्ही तुमच्या कुटुंबातील नवीन सदस्याचे नाव रेशन कार्ड मध्ये टाकू शकता. अनुक्रमानिका     पहा   कुटुंबातील नवीन सदस्याचे नाव रेशन कार्ड मध्ये कसे टाकायचे | How to Add New Family Member Name in Ration Card रेशन कार्ड मध्ये नवीन सदस्याचे नाव टाकण्यासाठी फॉर्म pdf | Download Ration Card Form For Add New Family Member in Ration Card लग्नानंतर नवीन वधू चे नाव रेशन कार्ड मध्ये कसे टाकायचे | How to Add Name in Ration Card After Marriage तुमच्या कुटुंबातील एखाद्या मुलाचे लग्न झाल्यानंतर. नवीन आलेल्या वधूचे नाव रे...

ई-श्रम कार्ड योजनेसाठी 28 कोटी कामगारांची नोंदणी, तब्बल ‘इतक्या’ लाखांचा फायदा

  सरकार नागरिकांना विविध योजनांमार्फत मदतीचा हात देत असत. नागरिकांना कोणत्या ना कोणत्या योजनेतून आर्थिक (Financial) साहाय्य मिळाल्यास त्यांना त्याचा फायदा होईल हाच हेतू सरकार (Government Yojana) ठेवून विविध योजना राबवत. यास योजनांपैकी  ई-श्रम कार्ड  (E- Shram Card) ही आहे. कोरोना महामारीच्या काळात लॉकडाऊनमुळे लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या. याचा सर्वाधिक परिणाम असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांवर झाला आहे. लोकांना मजबुरीने घरी जावे लागले. अशा परिस्थितीत या लोकांना मदत करण्यासाठी सरकारने 2020 मध्ये ई-श्रम कार्ड योजना (Yojana) सुरू केली. या योजनेद्वारे सरकार रस्त्यावर मजुरांना 2 लाख रुपयांपर्यंतचा लाभ देते. आतापर्यंत 28 कोटी कामगारांची नोंदणी ई श्रम कार्ड (E Shram Card Registration) योजना सुरू झाल्यानंतर आतापर्यंत देशातील तब्बल 28 कोटी कामगारांनी नोंदणी केली आहे. ज्यात बांधकाम कामगार, स्थलांतरित मजूर, शेती कामगार, घरगुती कामगार, कुली, रक्षक, नाई, मोची, इलेक्ट्रिशियन, प्लंबर, रिक्षाचालक, ब्युटी पार्लर कामगार, सफाई कामगार इत्यादींचा कामगार लोकांचा समावेश आहे. या योजनेत सहभा...