कृषि कर्ज | एल ॲण्ड टी फायनान्सतर्फे शेतकऱ्यांना फक्त 24 तासात मिळणार कर्ज! ‘या’ नव्या योजनेचा शुभारंभ, जाणून घ्या…
Loan | शेती करताना नेहमीच पैशांची गरज भासते. परंतु आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज घ्यावे लागते. कर्ज (Loan) काढायचं म्हटलं की, त्यातच शेतकऱ्यांचा बराच वेळ जातो. परंतु आता शेतकऱ्यांसाठी एल अँड टी फायनान्सतर्फे (Finance) केवळ 24 दिवसांमध्येच कर्ज मंजूर होणार आहे. फायनान्सने शेतकऱ्यांसाठी एक योजना सुरू केली आहे. ज्याद्वारे शेतकऱ्यांना लवकरात लवकर कर्ज (Loan) मंजूर होईल.
योजनेचा शुभारंभ
एल ॲण्ड टी फायनान्स होल्डींग लिमिटेडची उपकंपनी असलेली आणि अग्रगण्य नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्यांपैकी एक असलेल्या एल ॲण्ड टी फायनान्स लिमिटेडने (एलटीएफ) वेअरहाऊस रिसिप्ट फाइनेंसिंग(डब्लूआरएफ) योजनेचा शुभारंभ केला आहे. कृषी-मालावरील कर्ज सुविधांसाठी अशा प्रकारची आणि डिजीटल स्वरुपातील पहिली वित्तसहाय्य योजना आहे.
कसे दिले जाते वित्तसहाय्य?
वेअरहाऊस रिसिप्ट फाइनेंसिंग (डब्लूआरएफ) कर्ज सुरक्षित करण्यासाठी तारण म्हणून कृषीमालाचा वापर करते. तारण कृषीमाल व्यावसायिकरित्या व्यवस्थापित वेअरहाऊस मध्ये पॅनेल नियुक्त व्यवस्थापकांद्वारे सांभाळला जातो. या व्यवस्थेअंतर्गत, तारण कृषीमालाची गुणवत्ता आणि प्रमाण तपासले जाते आणि त्याच आधारावर तज्ज्ञ व्यवस्थापकांद्वारे शेतकरी, व्यापारी आणि कृषीमालावर प्रक्रिया करणार्यांना पावती दिली जाते. ही पावती तारण म्हणून वापरली जाते आणि त्याआधारे एल ॲण्ड टी फायनान्स लिमिटेडकडून कर्जरुपी वित्तसहाय्य दिले जाते.
भारतातील पहिली डिजिटल वित्तसहाय्य योजना
वेअरहाऊस रिसिप्ट फाइनेंसिंग योजना ही भारतात डिजीटल प्रणालीवर आधारित पहिली वित्तसहाय्य योजना ठरली. कर्जासाठी अर्ज भरल्यानंतर ग्राहकांना अवघ्या 24 तासाच्या आत सहाय्य मंजूर केले जाईल. कर्जाचे अतिशय जलद वितरण आणि कृषीमालाचीही निर्धोक सोडवणूक होते. कृषी क्षेत्रातील ग्राहकांना संपन्न पेपरलेस अनुभव मिळतो.
कोणाला मिळणार लाभ?
महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान आणि गुजरात या चार राज्यांमधील ग्राहकांसाठी वेअरहाऊस रिसिप्ट फाइनेंसिंग उपलब्ध असेल आणि ही सुविधा क्रांती घडवून आणेल. सध्या, ही सुविधा बाजारपेठेद्वारे पारंपारिक पद्धतीने दिली जाते आणि संबंधित दस्तऐवज प्रामुख्याने हाताने लिहिलेल्या (मॅन्युअल) स्वरूपातील असतो आणि प्रत्येक कर्ज अर्ज मंजूर होण्यासाठी 7 ते 10 दिवस इतका कालावधी लागतो. परंतु एल ॲण्ड टी फायनान्सच्या नव्या उत्पादनाच्या शुभारंभामुळे, ग्राहकांना कर्जाचा अर्ज दाखल केल्यापासून २४ तासांच्या आत मंजूरी मिळविण्याची आणि त्यांच्या कर्जाशी संबंधित सर्व माहिती प्लॅनेट या मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे त्यांच्या बोटाच्या नुसत्या एका टचने मिळतो. हा अनुभव याआधी कधीही ग्राहकांना मिळालेला नाही.
किती मिळेल कर्ज?
शेतकरी, व्यापारी आणि कृषीमाल प्रक्रियादार एल ॲण्ड टी फायनान्स लिमिटेडच्या जवळच्या शाखेत जाऊन या सुविधेचा लाभ घेऊ शकतात. अतिशय आकर्षक व्याजदरात एक लाख ते 10 कोटी रुपयांदरम्यान ते वित्तसहाय्य मिळवू शकतात. मंजूर केलेली रक्कम पात्रता तपासणी आणि कर्ज मार्जिन श्रेणीवर आधारित असेल, तसेच ती गुणवत्तेच्या मापदंडांवर आधारित कृषीमालाच्या बाजार मूल्याच्या 25 टक्के ते 30 टक्क्यांदरम्यान असेल.
व्यवस्थापकीय संचालक काय म्हणले?
नवीन वित्तसहाय्याच्या शुभारंभप्रसंगी बोलताना, एल ॲण्ड टी फायनान्स होल्डिंग्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री दीनानाथ दुभाषी म्हणाले, “आमचे लक्ष्य हे 2026 पर्यंत किंवा त्याआधी एक उच्च श्रेणीची, ग्राहक-केंद्रित, डिजिटली सक्षम रिटेल फायनान्स कंपनी बनणे हे होय. त्याच अनुषंगाने, आम्ही सातत्याने आमच्या ग्राहकांच्या गरजेनुसार आणि त्यांना निकड असेल तेव्हा वित्तसहाय्य उपलब्ध करुन देण्याच्या उत्पादनांवर सातत्याने काम करत आहोत. वेअरहाऊस रिसिप्ट फाइनेंसिंग(डब्लूआरएफ) ही आमच्याकडून देण्यात आलेली सुविधा असून जे ग्राहकांकडून कोणतेही फोरक्लोजर शुल्क न घेता जलद वितरण आणि लवचिक परतफेडीचे आश्वासन देते.
शेतकऱ्यांची गरज होणार पूर्ण
भारतातील रब्बी पेरणीचा हंगाम यंदा 720 लाख हेक्टरवर झाला असून विक्रमी क्षेत्रावर पेरणी पुर्ण झाली आहे. ही पेरणी गेल्या पाच वर्षांतील सर्वाधिक आहे. अशा परिस्थितीत आम्हाला आशा आहे की, आमच्या ग्राहकांना त्यांच्या खेळत्या भांडवलाच्या गरजा सोयीस्कर पद्धतीने पूर्ण करण्यात ही कर्जे मदत करतील. शिवाय, यामुळे बाजारातील वस्तूंचा पुरवठा आणि किमती स्थिर राहण्यास, उत्पादकांचे उत्पन्न सुधारण्यास आणि अन्नधान्याचे नुकसान कमी करण्यास हातभार लागेल.”
ग्राहकांना अधिकाधिक कर्जपुरवठा करण्याच्या वेगवान गतीमुळे 31 डिसेंबर 2022 रोजी संपलेल्या तिसर्या तिमाहीत तब्बल 57 हजार कोटी रुपये कर्जाचे वाटप कंपनीने केले आहे. त्यात गतवर्षाच्या तिमाहीच्या तुलनेत 34 टक्के वाढ झाली आहे. तर ग्रामीण व्यवसाय तसेच कृषी अवजारांसाठी वित्तपुरवठ्यासारख्या प्रमुख प्रकारांमुळे एकूण कर्जवाटपात किरकोळ वित्तपुरवठा पोर्टफोलिओचा वाटा 64 टक्के झाला आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा