Kisan Credit Card information in marathi – आतापर्यंत एक कोटी 94 लाख शेतकऱ्यांना. किसान क्रेडिट कार्ड वाटप करण्यात आले आहेत. किसान क्रेडिट कार्ड न मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी यावर्षी सुद्धा आनंदाची बातमी आहे. या रब्बी हंगामात उर्वरित शेतकऱ्यांना किसान के काळ उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. 66 लाख एवढ्या शेतकऱ्यांना हे किसान क्रेडिट कार्ड दिले जाणार आहे. तुम्हाला जर अजून मिळाले नसेल तर किसान क्रेडिट कार्ड तुम्हाला सुद्धा मिळू शकते.
किसान क्रेडिट कार्ड म्हणजे काय? | What is Kisan Credit Card in Marathi
किसान क्रेडिट कार्ड म्हणजे, शेतकऱ्यांना शेतमालासाठी ऐनवेळी पैसे लागतात. अशा वेळी शेतकऱ्यांकडे हक्काचे क्रेडिट असावे. याच्यासाठी सरकारने चालू केलेली किसान कार्य योजना आहे. मात्र या क्रेडिट कार्ड अंतर्गत शेतकरी केव्हाही आपल्या क्रेडिट कार्ड प्रमाणे पैसे काढू शकता. यावर्षी खूप साऱ्या शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड दिले जाणार आहे. किसान क्रेडिट कार्ड बद्दलची अधिक तर माहिती खाली देण्यात आली आहे.
50 हजार कर्ज माफी 2 री यादी या दिवशी
उत्पादन वाढवण्यासाठी दिले जाईल किसान क्रेडिट कार्ड
कृषी उत्पादन आयुक्तांकडून मिळालेल्या माहितीनुसार शेती सपाटीकरणामुळे खर्च कमी होत नाही. उलट सिंचन व खत याचा खर्च वाढतो. रब्बी हंगामात पिकल्या जाणारे कडधान्य व तेलबिया उत्पादन कमी होत चालले आहेत. शेतकऱ्यांना ऐनवेळी बियाणे घेण्यासाठी किंवा शेती करण्यासाठी कामात येणाऱ्या अवजारे व वस्तू पैसे अभावी घेता येत नाही. यासाठी मागील वर्षी 79452.21 कोटी एवढे पिक कर्ज वाटप करण्यात आले होते. पण यावर्षी रब्बी हंगामात शेतकऱ्यांना याच्यात वाढ करून 94508.58 एवढे पीक कर्ज वाटप करण्यात येणार आहे. अशावेळी शेतकऱ्यांना kisan credit card चा फायदा होणार आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा