मुख्य सामग्रीवर वगळा

गुढपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर फक्त ‘एकाच रुपयात’ घरी न्या ट्रॅक्टर; शेतकऱ्यांनो जाणून घ्या भन्नाट योजना

 गुढीपाडवाच्या शुभ मुहुर्तावर बजाज ॲग्रो ॲटो सेल्स शेतकऱ्यांनसाठी केवळ ‘एक रुपया भरा’ आणि ट्रॅक्टर (Tractor) घेवून जा अशा स्वरुपाची योजना (yojana)राबवित आहे. तसेच या सवलचीचा लाभ घेण्यासाठी शेतीचा सातबारा (Satbara) उतारा आणि आधार कार्ड ही कागदपत्रे जमा करुन आणि फायनान्स (Finance)मंजुरीनंतर केवळ एक रुपया भरुन तुम्ही ट्रॅक्टर घरी घेऊन जाऊ शकतात.


बजाज (Finance) ॲग्रो ॲटो सेल्सचे व्यवस्थापकीय संचालक शेखर बजाज यांनी या योजनेविषयी अधिक माहिती देताना सांगितले की व्हीएसटी मित्सुबिशी या कंपनीचे आम्ही सांगली जिल्ह्याचे अधिकृत डिलर आहोत. व्हीएसटी मित्सुबिशी शक्ती ट्रॅक्टरच्या १८, २२, २४, २७, २८, ३०, ४५ अश्वशक्ती क्षमतेच्या या सर्व मॉडेल्सवर ही आकर्षक योजना दिली आहे.


काय उद्दिष्ट आहे ही योजना राबविण्यामागे

सध्या पडत असलेल्या आवकाळी पावसामुळे शेतकरी हे अडचणीत सापडले आहेत. त्यांच्याकडे एखादी वस्तू खरेदी करण्यासाठी रोख रक्कम देखील नाही. यनमार थ्री सिलेंडर युक्त जॅपनीज तंत्रज्ञानाने संशोधित डीआय इंजिन असलेली सर्व ट्रॅक्टर (tractor)मॉडेल्स ही अत्याधुनिक स्वरुपाची आहेत. तसेच ही योजना (Yojana) सांगलीसह पलूस, जत, इस्लामपूर, शिराळा, विटा, कवठेमहांकाळ व कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ येथे राबवली जात आहे.

टिप्पण्या