मुख्य सामग्रीवर वगळा

शेतकरी असल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक, असे काढा शेतकरी प्रमाणपत्र

 


भारतामध्ये अनेकांचा व्यवसाय हा शेतीवर (Agriculture) अवलंबून आहे. भारत ( India) हा कृषिप्रधान देश असून कोरोना काळात महाराष्ट्राच्या ( Maharashtra) अर्थव्यवस्थेला शेती व्यवसायाने मोठा हातभार लावला असून शेतकऱ्यांचा अर्थव्यवस्था सुरळीत चालण्यात मोलाचा सहभाग आहे. तुम्ही जर शेती ( Farming) करत असाल तर तुम्ही शेतकरी (Farmer) असल्याचा प्रमाणपत्र ( Certificate) तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. नेमका कुठे भेटतो हा शेतकरी प्रमाणपत्र ( Farmers Certificate) याची संपूर्ण माहिती आपण आज जाणून घेणार आहोत.तसेच खाली आपले सरकारच्या अधिकृत संकेतस्थळाची लिंक देखील दिली आहे

कुठे मिळेल शेतकरी प्रमाणपत्र ?
१. शेतकरी प्रमाणपत्र हे तुम्हाला तहसीलदार कार्यालयातील सेतू केंद्र तसेच महाराष्ट्र शासनाने सुरु केलेल्या आपले सरकार पोर्टलवर देखील मिळवता येते.
२. तुम्ही जर कृषी विषयाशी निगडित पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेत असाल आणि तुमच्याकडे शेतकरी प्रमाणपत्र असेल तर तुम्हाला याचा मोठा फायदा होईल.
३. तुम्ही जर शेतकरी आहात आणि तुम्हाला जमीन खरेदी करायची असेल तर तुम्हाला शेतकरी प्रमाणपत्र सादर करावे लागते.

आवश्यक कागदपत्रे
१. आधार कार्ड ( Adhar Card)
२. पासपोर्ट साईझ फोटो ( Passport size photo)
३. मतदान कार्ड ( Voting Card)
४. रेशन कार्ड
५. पाणी बिल
६. ड्राइविंग लायसन्स
७. वीज बिल
८. सातबारा किंवा ८ अ उतारा
९. स्वंयघोषणापत्र

अर्ज कसा करावा ?
१. आपले सरकारच्या अधिकृत वेबसाइट वर जाऊन नवीन वापरकर्ता नोंदणी या बटनावर क्लिक करून आपले नाव, मोबाइल क्रमांक , ई-मेल आयडी आदी माहिती भरून लॉगिन करावे.
२. त्यांनतर तुम्हाला समोर विविध विभागाचे नाव दिसतील त्यांपैकी महसूल विभाग निवडून महसूल सेवा बटनावर क्लिक करा.
३. पुढे तुम्हाला शेतकरी प्रमाणपत्र नावाचा पर्याय दिसेल त्या पर्यायावर क्लिक करा.
४. एक अर्ज उघडेल त्यामध्ये विचारण्यात आलेली संपूर्ण माहिती भरून आवश्यक कागदपत्रे वेबसाइट वर अपलोड करावेत.
५. याबरोबर तुमचा फोटो तसेच सही देखील अपलोड करावी लागते.

अधिकृत संकेतस्थळ

https://aaplesarkar.mahaonline.gov.in/

टिप्पण्या

Popular Posts

कृषि कर्ज | एल ॲण्ड टी फायनान्सतर्फे शेतकऱ्यांना फक्त 24 तासात मिळणार कर्ज! ‘या’ नव्या योजनेचा शुभारंभ, जाणून घ्या…

  Loan | शेती करताना नेहमीच पैशांची गरज भासते. परंतु आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज घ्यावे लागते. कर्ज (Loan) काढायचं म्हटलं की, त्यातच शेतकऱ्यांचा बराच वेळ जातो. परंतु आता शेतकऱ्यांसाठी एल अँड टी फायनान्सतर्फे (Finance) केवळ 24 दिवसांमध्येच कर्ज मंजूर होणार आहे. फायनान्सने शेतकऱ्यांसाठी एक योजना सुरू केली आहे. ज्याद्वारे शेतकऱ्यांना लवकरात लवकर कर्ज (Loan) मंजूर होईल. योजनेचा शुभारंभ एल ॲण्ड टी फायनान्स होल्डींग लिमिटेडची उपकंपनी असलेली आणि अग्रगण्य नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्यांपैकी एक असलेल्या एल ॲण्ड टी फायनान्स लिमिटेडने (एलटीएफ) वेअरहाऊस रिसिप्ट फाइनेंसिंग(डब्लूआरएफ) योजनेचा शुभारंभ केला आहे. कृषी-मालावरील कर्ज सुविधांसाठी अशा प्रकारची आणि डिजीटल स्वरुपातील पहिली वित्तसहाय्य योजना आहे. कसे दिले जाते वित्तसहाय्य? वेअरहाऊस रिसिप्ट फाइनेंसिंग (डब्लूआरएफ) कर्ज सुरक्षित करण्यासाठी तारण म्हणून कृषीमालाचा वापर करते. तारण कृषीमाल व्यावसायिकरित्या व्यवस्थापित वेअरहाऊस मध्ये पॅनेल नियुक्त व्यवस्थापकांद्वारे सांभा‌ळला जातो. या व्यवस्थेअंतर्गत, तारण कृषीमालाची गुणवत्ता आण...

रेशकार्ड मध्ये कुटुंबातील नवीन सदस्याचे नाव कसे टाकायचे | How to Add Name in Ration Card in Marathi

  How to Add Name in Ration Card in Marathi –   तुमच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचे नाव रेशन कार्ड मध्ये नसेल. तर तुम्ही हे नाव रेशन कार्ड मध्ये कसे टाकायचे. लग्न झाल्यानंतर तुमच्या कुटुंबात आलेल्या नवीन सुनेचे नाव रेशन कार्ड मध्ये कसे टाकायचे. नवीन जन्मलेल्या बाळाचे नाव रेशन कार्ड मध्ये कसे टाकायचे. रेशन कार्ड मध्ये नवीन नाव टाकण्यासाठी चा फॉर्म कसा डाऊनलोड करायचा. रेशन कार्ड मध्ये नवीन नाव Add करण्यासाठी काय करायचे सर्व माहिती दिली आहे. या माहितीचा वापर करून तुम्ही तुमच्या कुटुंबातील नवीन सदस्याचे नाव रेशन कार्ड मध्ये टाकू शकता. अनुक्रमानिका     पहा   कुटुंबातील नवीन सदस्याचे नाव रेशन कार्ड मध्ये कसे टाकायचे | How to Add New Family Member Name in Ration Card रेशन कार्ड मध्ये नवीन सदस्याचे नाव टाकण्यासाठी फॉर्म pdf | Download Ration Card Form For Add New Family Member in Ration Card लग्नानंतर नवीन वधू चे नाव रेशन कार्ड मध्ये कसे टाकायचे | How to Add Name in Ration Card After Marriage तुमच्या कुटुंबातील एखाद्या मुलाचे लग्न झाल्यानंतर. नवीन आलेल्या वधूचे नाव रे...

ई-श्रम कार्ड योजनेसाठी 28 कोटी कामगारांची नोंदणी, तब्बल ‘इतक्या’ लाखांचा फायदा

  सरकार नागरिकांना विविध योजनांमार्फत मदतीचा हात देत असत. नागरिकांना कोणत्या ना कोणत्या योजनेतून आर्थिक (Financial) साहाय्य मिळाल्यास त्यांना त्याचा फायदा होईल हाच हेतू सरकार (Government Yojana) ठेवून विविध योजना राबवत. यास योजनांपैकी  ई-श्रम कार्ड  (E- Shram Card) ही आहे. कोरोना महामारीच्या काळात लॉकडाऊनमुळे लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या. याचा सर्वाधिक परिणाम असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांवर झाला आहे. लोकांना मजबुरीने घरी जावे लागले. अशा परिस्थितीत या लोकांना मदत करण्यासाठी सरकारने 2020 मध्ये ई-श्रम कार्ड योजना (Yojana) सुरू केली. या योजनेद्वारे सरकार रस्त्यावर मजुरांना 2 लाख रुपयांपर्यंतचा लाभ देते. आतापर्यंत 28 कोटी कामगारांची नोंदणी ई श्रम कार्ड (E Shram Card Registration) योजना सुरू झाल्यानंतर आतापर्यंत देशातील तब्बल 28 कोटी कामगारांनी नोंदणी केली आहे. ज्यात बांधकाम कामगार, स्थलांतरित मजूर, शेती कामगार, घरगुती कामगार, कुली, रक्षक, नाई, मोची, इलेक्ट्रिशियन, प्लंबर, रिक्षाचालक, ब्युटी पार्लर कामगार, सफाई कामगार इत्यादींचा कामगार लोकांचा समावेश आहे. या योजनेत सहभा...