मुख्य सामग्रीवर वगळा

प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना रजिस्ट्रेशन 2023: Official Website,टोल फ्री नंबर

 Posted on 

नमस्कार मित्रांनो, आज आपण प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना 2022 या योजने संदर्भात माहिती पाहणार आहोत. यामध्ये आपण काय आहे श्रमयोगी मानधन योजना, त्याचे वैशिष्ट्य काय आहे, PMSYM योजना लाभार्थी पात्रता काय, कोण लाभ घेऊ शकत नाही, PMSYMआवश्यक कागदपत्रे कोणती, प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना साठी अर्ज कुठे व कसा करायचा, प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना हेल्पलाईन क्रमांक काय आहे तसेच या योजनेच्या अटी कोणत्या या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आज या लेखात मिळणार आहे. जर तुम्ही असंघटीत क्षेत्रातील कामगार असाल, तर ही योजना तुमच्यासाठीच आहे. या योजनेअंतर्गत पेन्शन मिळवण्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.

Contents  hide 

PM Shram Yogi Mandhan Yojana 2022

प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेअंतर्गत देशातील संघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना पेन्शन सुरू करण्यात आलेली आहे. प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी १ फेब्रुवारी २०१९ रोजी जाहीर केली होती. आणि प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना १५ फेब्रुवारी २०१९ पासून लागू करण्यात आलेली आहे. हि योजना वीट भट्टी कामगार, घरगुती नोकर, रिक्षाचालक, मजूर, शिंपी, मोची इत्यादी असंघटित क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कामगारांसाठी सुरू केलेली आहे. मासिक उत्पन्न १५,०००/- रुपये किंवा त्यापेक्षा कमी असणारे असंघटित क्षेत्रातील कामगार या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

या योजनेअंतर्गत वयाच्या ६० वर्षानंतर लाभार्थ्यांना प्रतिमहा पेन्शन देण्यात येणार आहे. ही पेन्शन दरमहा ३,०००/- रुपये दिली जाईल. आत्तापर्यंत ४४.९० लाखांहून अधिक कामगारांनी नोंदणी केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याला दरमहा गुंतवणूक करावी लागणार आहे. गुंतवणूकीची रक्कम ही वयाच्या आधारावर निश्चित केली जाईल. ही रक्कम ५५/- रुपयांपासून २००/- रुपयांपर्यंत असेल. पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजनेअंतर्गत अंदाजे १० कोटी लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार आहे.

पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजनेची उद्दिष्ट काय?

PMSYM योजनेचे मुख्य उद्दिष्ट असंघटीत क्षेत्रातील कामगारांना वयाच्या साठ वर्षानंतर पेन्शन देऊन या योजनेद्वारे त्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करणे हे आहे. तसेच वृद्धापकाळात त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी या योजनेअंतर्गत त्यांना स्वावलंबी व सशक्त बनवणे. असंघटित क्षेत्रातील कामगारांना त्यांच्या वृद्धापकाळातील आयुष्य जगण्यासाठी कोणत्याही प्रकारचा सहारा नसतो. म्हणून केंद्र सरकार अशा योजना अंतर्गत सर्व गरीब आणि मजुरांना या योजने अंतर्गत प्रतिमहा ३,०००/- रुपयापर्यंत ची पेन्शन देऊन आर्थिक मदत करत आहे. प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेअंतर्गत निश्चित उत्पन्नाचे स्रोत नसणाऱ्या अशा कामगारांना दिलासा मिळणार आहे.

Pradhanmantri Pension Yojana: प्रधानमंत्री वय वंदना पेन्शन योजना माहिती

प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेची लाभ कोणते?

  • प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना वयाच्या साठ वर्षानंतर प्रतिमहा ३,०००/- रुपये इतकी पेन्शन दिली जाईल.
  • लाभार्थ्यांची पेन्शन रक्कम ही त्याच्या प्रीमियम रकमेवर अवलंबून असेल. त्याने जेवढी योगदान रक्कम भरलेली आहे, त्या रकमेनुसार सरकार तुमच्या खात्यात पैसे जमा करेल.
  • जर लाभार्थी या योजनेअंतर्गत पेन्शन घेताना मरण पावला, तर त्याच्या पेन्शनच्या रकमेच्या ५० टक्के रक्कम त्याच्या जोडीदाराला पेन्शन म्हणून दिली जाईल. म्हणजेच लाभार्थ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या पत्नीला १,५००/- रुपये प्रतिमहा पेन्शन मिळेल.

प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेअंतर्गत लाभ कोण घेऊ शकत नाही?

  • जे नागरिक आयकर भरतात असे नागरिक
  • राष्ट्रीय पेन्शन योजनेचे सदस्य
  • संघटित क्षेत्रातील व्यक्ती
  • राज्य कर्मचारी विमा महामंडळाचे सदस्य
  • कर्मचारी भविष्य निधी सदस्य

प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना अंतर्गत कोण लाभ घेऊ शकतो?

  • भूमिहीन शेतमजूर
  • लहान आणि सीमांत शेतकरी
  • पशुपालक आणि दगडाच्या खाणी मध्ये लेबलिंग आणि पॅकिंग करणारे
  • कोळी
  • पशुपालक
  • बांधकाम आणि पायाभूत सुविधा कामगार
  • स्थलांतरित मजूर
  • विणकर
  • सफाई कामगार
  • भाजी आणि फळविक्रेता
  • घरगुती कामगार

अपंग पेन्शन योजना महाराष्ट्र २०२१: फॉर्म PDF, कागदपत्रे, पात्रता,अर्ज, लाभ माहिती

प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेची आवश्यक पात्रता काय?

  • अर्जदाराचे वय १८ ते ४० वर्षांत दरम्यान असावे.
  • योजनेसाठी बँक खाते असणे अनिवार्य आहे.
  • अर्जदार असंघटित क्षेत्रातील कामगार असावा.
  • अर्जदार व्यक्तीचे मासिक उत्पन्न १५,०००/- रुपयांपेक्षा जास्त नसावे.
  • अर्जदाराकडे आधार क्रमांक आणि मोबाईल फोन असणे आवश्यक आहे.
  • पीएम श्रमयोगी मानधन योजना अर्जदार आयकर भरणारा नसावा.
  • सरकारी कर्मचारी कर्मचारी भविष्य निधी (EPF) राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS) आणि राज्य कर्मचारी विमा महामंडळ (ESIC) चे सदस्य या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत.

प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना 2022 वैशिष्ट्ये

  • अर्जदार लाभार्थी द्वारे एलआयसी कार्यालयात मासिक प्रीमियम देखील जमा केला जाईल.
  • योजना पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्याला मासिक पेन्शन दिली जाईल.
  • ही मिळणारी मासिक पेन्शन थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये हस्तांतरित केली जाईल.
  • या योजनेसंदर्भात अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या कोणत्याही लाईफ कार्पोरेशन ऑफ इंडिया कार्यालयाशी संपर्क साधू शकता.

प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना (PMSYM ) साठी अर्ज आवश्यक कागदपत्रे कोणती?

  • बँक खाते पासबुक
  • मोबाईल नंबर
  • आधार कार्ड
  • मतदान ओळखपत्र
  • पासपोर्ट आकाराचे फोटो

प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना  (रजिस्ट्रेशन) साठी अर्ज कसा करावा?

  • इच्छुक अर्जदाराला सर्वप्रथम प्रधानमंत्री श्रमयोगी योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी सर्व कागदपत्रांसह जवळच्या सार्वजनिक सेवा केंद्रांमध्ये जावे लागेल.
  • यानंतर अर्जदाराला आपली सर्व कागदपत्रे सीएससी अधिकाऱ्याला द्यावी लागतील.
  • यानंतर सीएससी अधिकारी एजंट तुमचा प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना चा ऑनलाईन फॉर्म भरेल.
  • अर्ज भरून झाल्यानंतर त्या अर्जाची प्रिंट तुम्हाला देईल.
  • या अर्जाची प्रिंट आउट तुम्ही तुमच्याकडे भविष्यासाठी सुरक्षित ठेवा.
  • अशाप्रकारे तुमचा प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेची साठीचा अर्ज यशस्वीरित्या पूर्ण होईल.
प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना official website

PMSYM Important Links-

  • PMSYM योजनेतील प्रीमियम रक्कम चार्ट – maandhan.in/scheme/pmsym
  • प्रधानमंत्री श्रम योगी मानधन  Official Webiste – maandhan.in/shramyogi
  • How to apply PMSYM scheme – maandhan.in/scheme/pmsym

PMSYM 2022 अटी कोणत्या?

  • जर लाभार्थी दहा वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीनंतर पण साठ वर्षाच्या व यापूर्वी या योजनेतून बाहेर पडत असेल, तर लाभार्थ्याला जमा झालेल्या व्याजासह अंशदान किंवा बचत बँक दर यापैकी जे जास्त असेल ते योगदान दिले जाईल.
  • जर लाभार्थ्यांचा मृत्यू झाला असेल, तर त्याचा जीवन साथीदार योजना चालू ठेवू शकतो.
  • जर लाभार्थी १० वर्षांपूर्वी योजनेतून बाहेर पडला, तर योगदान बचत खात्याच्या दराने त्याला दिले जाईल.
  • जर एखादी व्यक्ती वयाच्या साठ वर्षांपूर्वी कायमस्वरूपी आश्रित बनली आणि ही योजना सुरू ठेवण्यासाठी असमर्थ असेल, तर त्याचा जोडीदार ही योजना पुढे सुरू ठेवू शकतो. या व्यतिरिक्त NSSB च्या सल्ल्यानुसार सरकार इतर निर्गमन देखील करू शकते.

अटल पेन्शन योजना (APY) बेनिफिट्स २०२१ प्रीमियम चार्ट PDF Details

प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना का हेल्पलाइन नंबर –

  • ई-मेल आईडी – vyapari@gov.in | shramyogi@nic.in
  • हेल्पलाईन नंबर -1800 267 6888

टिप्पण्या

Popular Posts

रेशन कार्ड धारकांना मोठा झटका बसणार आहे. सरकारने नवे नियम (Ration Card Rule) जारी केले आहेत.

  रेशन कार्ड हे भारत सरकारने सर्व नागरिकांसाठी जारी केलेले एक अतिशय महत्त्वाचे दस्तऐवज आहे. प्रत्येक राज्यात राहणाऱ्या नागरिकांना सार्वजनिक वितरण प्रणालीच्या आधारे राज्य सरकारकडून रेशन कार्ड (Ration Card Rule) जारी केले जाते. तुम्ही याच रेशन कार्डचा (Ration Card Rule) उपयोग सर्व नागरिकांना ओळखीचा पुरावा आणि निवासी पत्त्याव्यतिरिक्त अन्न सुरक्षा आणि अनेक सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी करता येईल. नवे नियम केले जारी दारिद्र्यरेषेखालील रेशनकार्डधारकांसाठी म्हणजेच दारिद्र्यरेषेखालील नागरिकांसाठी सरकारकडून अनेक योजना राबवल्या जातात. केवळ पात्र नागरिकांनाच या योजनांचा लाभ मिळावा यासाठी शिधापत्रिका अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. परंतु आता भारत सरकारने शिधापत्रिकांसाठी अनेक नवीन नियम केले आहेत. रेशन कार्ड धारकांना मोठा झटका! ‘या’ चार कारणांमुळे रेशन होणार रद्द, नवे नियम जारी 100 चौरस मीटरपेक्षा जास्त भूखंड, घर किंवा फ्लॅट (प्लॉट, घर किंवा फ्लॅट) असलेले असे नागरिक रेशन योजनेसाठी अपात्र असतील. जर एखाद्या व्यक्तीकडे चारचाकी किंवा ट्रॅक्टर सारखी वाहतूक असेल तर त्यांना रेशनकार्ड अंतर्गत लाभ ...

प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना

  “प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजने” द्वारे हर खेत को पानी” ही घोषणा. भारत सरकार पाणी रक्षण आणि त्याच्या शासनासाठी आवश्यक असलेल्या उच्च कराराचे निराकरण करते. या प्रभावासह, प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना (PMKSY) ने तपशीलवार माहिती दिली आहे: दृष्टी ‘हर खेत को पानी’ या जलप्रणालीच्या समावेशाचा प्रसार करणे आणि पाणी वापर प्रवीणता सुधारणे हे सरकारचे ध्येय आहे. मिशन स्त्रोत निर्मिती, वितरण, बोर्ड, फील्ड ऍप्लिकेशन आणि शेतकर्‍यांसाठी विकास कवायती यांवर सुरुवातीपासून समाप्तीची व्यवस्था करून आकर्षक पद्धतीने ‘मोअर हार्वेस्ट पर ड्रॉप’ साध्य करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

शेतकरी असल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक, असे काढा शेतकरी प्रमाणपत्र

  भारतामध्ये अनेकांचा व्यवसाय हा शेतीवर (Agriculture) अवलंबून आहे. भारत ( India) हा कृषिप्रधान देश असून कोरोना काळात महाराष्ट्राच्या ( Maharashtra) अर्थव्यवस्थेला शेती व्यवसायाने मोठा हातभार लावला असून शेतकऱ्यांचा अर्थव्यवस्था सुरळीत चालण्यात मोलाचा सहभाग आहे. तुम्ही जर शेती ( Farming) करत असाल तर तुम्ही शेतकरी (Farmer) असल्याचा प्रमाणपत्र ( Certificate) तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. नेमका कुठे भेटतो हा शेतकरी प्रमाणपत्र ( Farmers Certificate) याची संपूर्ण माहिती आपण आज जाणून घेणार आहोत.तसेच खाली आपले सरकारच्या अधिकृत संकेतस्थळाची लिंक देखील दिली आहे कुठे मिळेल शेतकरी प्रमाणपत्र ? १. शेतकरी प्रमाणपत्र हे तुम्हाला तहसीलदार कार्यालयातील सेतू केंद्र तसेच महाराष्ट्र शासनाने सुरु केलेल्या आपले सरकार पोर्टलवर देखील मिळवता येते. २. तुम्ही जर कृषी विषयाशी निगडित पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेत असाल आणि तुमच्याकडे शेतकरी प्रमाणपत्र असेल तर तुम्हाला याचा मोठा फायदा होईल. ३. तुम्ही जर शेतकरी आहात आणि तुम्हाला जमीन खरेदी करायची असेल तर तुम्हाला शेतकरी प्रमाणपत्र सादर करावे लागते...