मुख्य सामग्रीवर वगळा

Borewell Water Sources | उन्हाळ्यात पडीक जमीनही बहरणार! ‘हे’ केमिकल टाकताच बंद बोअरलाही येणारं पाणी, तरुणाच्या संशोधनाचं गडकरींकडून कौतुक

 Borewell Water Sources | शेतकऱ्यांना शेतीसाठी सर्वात गरजेची गोष्ट असते ती म्हणजे पाणी. पाण्याशिवाय शेती होऊ शकत नाही. म्हणूनच पाण्यासाठी शेतकरी नदी, विहीर, तलाव, शेततळे किंवा बोअरवेलचा(borewell water) वापर करतात. बोरवेलचा हा शहरांमध्येही आणि गावांमध्ये शेतीसाठीही केला जातो. परंतु अनेकदा काही कारणास्तव बोअरवेलमधून पाणी (Agricultural Water source) येणे बंद होते. बोअरवेलमध्ये क्षार तसेच झाडांच्या मुळ्या, दगड, माती अडकते. म्हणून अनेकदा बोरवेल बंद पडते. आजच्या महागाईच्या युगात शेतकऱ्यांना या बोअरची तपासणी करण्यासाठी प्रचंड पैसे मोजावे लागतात. म्हणूनच एका तरुणानं एक संशोधन (Agricultural Water Sources) केलं आहे. त्याची ही भन्नाट कामगिरी पाहता थेट केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनीच या तरुणाची पाठ थोपटली आहे.



शेतकऱ्यांची चिंताच मिटली
आता बोअरवेल बंद पडले तर शेतकऱ्यांना घाबरून जाण्याची काहीच गरज नाही. कारण या तरुणाला शेतकऱ्यांची कायमची चिंता मिटवली आहे. तुमचं बंद पडलं तर चुटकीसरशी बोअरमध्ये केमिकल टाकून त्यातून पाणी निघू शकणार आहे. म्हणजेच या केमिकलमुळे बंद बोअरमधूनही (borewell water)पाणी येणार आहे. तरुणाचं हे संशोधन शेतकऱ्यांसाठी एखाद्या वरदानापेक्षा कमी ठरणार नाही. सोलापूरच्या व्यवसायाने खनिज अभियंता असलेल्या विशाल बगले या तरुणाने यावर उपाय शोधलेला आहे. त्याच्या या संशोधनाची दखल नितीन गडकरी यांनीही घेतली आहे.


काय आहे संशोधन?
विशालने शोधलेल्या तंत्रज्ञानाचे नाव आहे केमिकल स्टिम्युलेशन तंत्रज्ञान. या केमिकलच्या वापराने कोरड्या पडलेल्या बोअरमधील (borewell water)झरे मोकळे होऊन पाणी वाढण्यास मदत होते. हे केमिकल अल्प दरात उपलब्ध होणार आहे. यामुळे बोअरवेलच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

वाचाYojana | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! आता शेळीपालनासाठी 100 टक्के अनुदान, ‘या’ दोन योजनांना मंजुरी

शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा
खालावत चाललेल्या भूजल पातळीमळे शेतकरी आधीच त्रस्त आहे. त्यात जर भर उन्हाळ्यात बोअरवेल बंद पडली तर शेतकऱ्यांपुढे मोठे संकट उभे रहाते. जीवापाड वाढवलेले पीक वाळून जाण्याची भीती असते. मात्र या केमिकलच्या वापराने बोअरवेलमधील झरे मोकळे होतात. पाण्याचा प्रवाह वाढल्याने बोअरवेलमधील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होते. यामुळे उन्हाळ्यातही पिकांना योग्य प्रमाणात पाणी मिळाल्यास शेतकऱ्यांना सुटकेचा निःश्वास टाकता येईल.

गडकरींची कौतुकाची थाप
केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या संशोधनासाठी विशालचे कौतुक केले आहे. त्यांनी या संशोधनाची माहिती केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र तोमर, केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेन्द्र सिंह शेखावत, राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांना दिली. तसेच महाराष्ट्र सरकारला पत्र लिहून हा प्रकल्प राबविण्यासाठी गडकरींनी सुचविले.

टिप्पण्या

Popular Posts

रेशन कार्ड धारकांना मोठा झटका बसणार आहे. सरकारने नवे नियम (Ration Card Rule) जारी केले आहेत.

  रेशन कार्ड हे भारत सरकारने सर्व नागरिकांसाठी जारी केलेले एक अतिशय महत्त्वाचे दस्तऐवज आहे. प्रत्येक राज्यात राहणाऱ्या नागरिकांना सार्वजनिक वितरण प्रणालीच्या आधारे राज्य सरकारकडून रेशन कार्ड (Ration Card Rule) जारी केले जाते. तुम्ही याच रेशन कार्डचा (Ration Card Rule) उपयोग सर्व नागरिकांना ओळखीचा पुरावा आणि निवासी पत्त्याव्यतिरिक्त अन्न सुरक्षा आणि अनेक सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी करता येईल. नवे नियम केले जारी दारिद्र्यरेषेखालील रेशनकार्डधारकांसाठी म्हणजेच दारिद्र्यरेषेखालील नागरिकांसाठी सरकारकडून अनेक योजना राबवल्या जातात. केवळ पात्र नागरिकांनाच या योजनांचा लाभ मिळावा यासाठी शिधापत्रिका अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. परंतु आता भारत सरकारने शिधापत्रिकांसाठी अनेक नवीन नियम केले आहेत. रेशन कार्ड धारकांना मोठा झटका! ‘या’ चार कारणांमुळे रेशन होणार रद्द, नवे नियम जारी 100 चौरस मीटरपेक्षा जास्त भूखंड, घर किंवा फ्लॅट (प्लॉट, घर किंवा फ्लॅट) असलेले असे नागरिक रेशन योजनेसाठी अपात्र असतील. जर एखाद्या व्यक्तीकडे चारचाकी किंवा ट्रॅक्टर सारखी वाहतूक असेल तर त्यांना रेशनकार्ड अंतर्गत लाभ ...

प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना

  “प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजने” द्वारे हर खेत को पानी” ही घोषणा. भारत सरकार पाणी रक्षण आणि त्याच्या शासनासाठी आवश्यक असलेल्या उच्च कराराचे निराकरण करते. या प्रभावासह, प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना (PMKSY) ने तपशीलवार माहिती दिली आहे: दृष्टी ‘हर खेत को पानी’ या जलप्रणालीच्या समावेशाचा प्रसार करणे आणि पाणी वापर प्रवीणता सुधारणे हे सरकारचे ध्येय आहे. मिशन स्त्रोत निर्मिती, वितरण, बोर्ड, फील्ड ऍप्लिकेशन आणि शेतकर्‍यांसाठी विकास कवायती यांवर सुरुवातीपासून समाप्तीची व्यवस्था करून आकर्षक पद्धतीने ‘मोअर हार्वेस्ट पर ड्रॉप’ साध्य करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

शेतकरी असल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक, असे काढा शेतकरी प्रमाणपत्र

  भारतामध्ये अनेकांचा व्यवसाय हा शेतीवर (Agriculture) अवलंबून आहे. भारत ( India) हा कृषिप्रधान देश असून कोरोना काळात महाराष्ट्राच्या ( Maharashtra) अर्थव्यवस्थेला शेती व्यवसायाने मोठा हातभार लावला असून शेतकऱ्यांचा अर्थव्यवस्था सुरळीत चालण्यात मोलाचा सहभाग आहे. तुम्ही जर शेती ( Farming) करत असाल तर तुम्ही शेतकरी (Farmer) असल्याचा प्रमाणपत्र ( Certificate) तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. नेमका कुठे भेटतो हा शेतकरी प्रमाणपत्र ( Farmers Certificate) याची संपूर्ण माहिती आपण आज जाणून घेणार आहोत.तसेच खाली आपले सरकारच्या अधिकृत संकेतस्थळाची लिंक देखील दिली आहे कुठे मिळेल शेतकरी प्रमाणपत्र ? १. शेतकरी प्रमाणपत्र हे तुम्हाला तहसीलदार कार्यालयातील सेतू केंद्र तसेच महाराष्ट्र शासनाने सुरु केलेल्या आपले सरकार पोर्टलवर देखील मिळवता येते. २. तुम्ही जर कृषी विषयाशी निगडित पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेत असाल आणि तुमच्याकडे शेतकरी प्रमाणपत्र असेल तर तुम्हाला याचा मोठा फायदा होईल. ३. तुम्ही जर शेतकरी आहात आणि तुम्हाला जमीन खरेदी करायची असेल तर तुम्हाला शेतकरी प्रमाणपत्र सादर करावे लागते...