शेतकऱ्यांना ‘या’ योजनेंतर्गत मिळतंय प्लास्टिक मल्चिंगसाठी 50 टक्के अनुदान, त्वरित अर्ज करण्याचे कृषी विभागाचे आवाहन
शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जातात. जेणेकरून शेतकऱ्यांना शेती (Agriculture) करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. शेतकरी शेतात मोठ्या प्रमाणात भाजीपाला, फळ लागवड करून आर्थिक (Financial) नफा कमावू शकतात. म्हणूनच शेतकऱ्यांना आता एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत शेतकऱ्यांना प्लास्टिक मल्चिंग पेपरसाठी अनुदान (Plastic Mulching Paper Subsidy) दिले जात आहे. चला तर मग शेतकऱ्यांना प्लास्टिक मल्चिंग पेपरसाठी किती अनुदान (Subsidy) मिळत ते जाणून घेऊयात.
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान
शेतकऱ्यांना (Agricultural Information) 3 महिन्यांसाठी भाजीपाला लागवडीसाठी आणि बहुवार्षिक फळबागांसाठी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत प्लास्टिक मल्चिंग पेपरसाठी अनुदान (Subsidy) दिले जात आहे. या योजनेच्या लाभासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावेत, असे आवाहन कृषी विभागाने (Department of Agriculture) केले आहे.
किती मिळतंय अनुदान?
शेतकऱ्यांना प्लास्टिक मल्चिंग पेपरसाठी एकात्मिक फलोत्पादन विकास योजनेअंतर्गत योजनेअंतर्गत 50 टक्के इतके अनुदान दिले जाते. प्लास्टिक मल्चिंगसाठी प्रति हेक्टरी 32 हजार रुपये खर्च ग्राह्य धरला जातो. याच खर्चाच्या निम्मी म्हणजेच 50 टक्के इतकी रक्कम शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत अनुदान म्हणून दिली जाते. 32 हजारांच्या निम्मी रक्कम म्हणजे शेतकऱ्यांना 16 हजार रुपये प्लास्टिक मल्चिंग पेपरसाठी अनुदान मिळते.
कसा कराल अर्ज?
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान या योजनेच्या लाभासाठी महाडीबीटी फार्मर स्कीम यावर अर्ज करावा लागेल. यासाठी शेतकऱ्यांना संपूर्ण माहिती देऊन आणि कागदपत्रांची पूर्तता करून अर्ज भरावा लागेल. जेणेकरून शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळेल.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा